🌹गोड गोड बोला🌹
दया क्षमा शांती प्रेम असावा मायेचा लळा मद ,मत्सर,राग,लोभ भाऊ मनापासुन सोळा !! तिळ,गुळ,घ्या भाऊ गोड गोड बोला !!
जात नाही धर्म नाही नात माणुसकीच जोळा विज्ञानाची कास धरा आता अंधश्रद्धा सोळा !! तिळ,गुळ,घ्या भाऊ गोड गोड बोला !!
शिक्षण वाघीणीच दुध जनू तिसरा डोळा मंदीर नाही मस्जिद नाही चला मोठी करु शाळा !! तिळ,गुळ,घ्या भाऊ गोड गोड बोला !!
भाकर ईमानाची खावी वाट बेईमानीची सोळा नोका केसान कापु भाऊ विश्वासाचा गळा !! तिळ,गुळ,घ्या भाऊ गोड गोड बोला !!
देशप्रेम देशहित सारे ह्रदया ह्रदयात पाळा एकी हेचि बळ असे असावा एकमेकांत लळा !! तिळ,गुळ,घ्या भाऊ गोड गोड बोला !!
लोकसेवक लोकनेते देल्ले आश्वासने पाळा घेतला वसा टाकू नका भाऊ भ्रष्टाचार सोळा !! तिळ,गुळ,घ्या भाऊ गोड गोड बोला !!
घट्ट विणाव नातंगोतं पडू नये धागा ढीला खेळ कापाकापीचा सोडा मौजे पतंग ऊडऊ चला !! तिळ,गुळ,घ्या भाऊ गोड गोड बोला !! ✍️वासुदेव महादेवराव खोपडे सहा.पोलिस उपनिरिक्षक (सेनि) अकोला (9923488556) 🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
Post a Comment