अहिल्यानगर : पुणे येथे दि. २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्य महोत्सव – ६ व्या ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड स्पर्धा २०२६’ मध्ये श्रीगोंदा येथील बालकलाकारांनी सहभाग घेत घवघवीत यश संपादन केले.भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत श्रीहरी निकेतन, नागपूर यांच्या वतीने स्वरमय नृत्य निकेतन यांच्या सहकार्याने या सांस्कृतिक नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील विविध भागांतून नृत्यकलावंत व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
येथील स्ट्रीट डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, लोकनृत्य, मॉडर्न डान्स तसेच बॉलीवूड डान्स प्रकारात आपली कला सादर करून परीक्षकांची मने जिंकली.पाच वर्षांखालील गटातील बॉलीवूड डान्सला प्रथम क्रमांक मिळाला. या गटात तन्वी निंभोरे, अंशिका धस, श्रीशा धर्माधिकारी, मायरा खेतमालीस व तक्ष लाकूडझोडे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.तेरा वर्षे वयोगटातील भरतनाट्यम समूह नृत्याला प्रथम क्रमांक मिळाला. या गटात श्रावणी जगताप, रियांशी अनभुले, राश्मिता भोयटे, दृष्टी गायकवाड, आयुश्री डोळे, आभा मुथा, नक्षत्रा पलीवाल, श्रावी नागावडे, काव्या राऊत, अंतरा साबळे, अक्षरा साबळे, मृणाल ताकपेरे, देवांशी पोखरणा व मिताली पंडित यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.सोलो डान्समध्ये मुक्ता महाजन हिने तांडव नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळवला. सावी खुडे हिने लोकनृत्य प्रकारात द्वितीय, तर हर्षिता घोडके हिने मॉडर्न डान्समध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच दिवीक गजभिये, वेदिका उगले, काव्या चाकणे व काव्या परकाळे यांनी विविध नृत्यप्रकारांत सादरीकरण करत तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबरोबरच अकॅडमीच्या व्यवस्थापक व कोरिओग्राफर प्रणाली व सुमेध गजभिये यांना त्यांच्या नृत्यकलेतील योगदानाबद्दल ‘नृत्य कला गुरु आचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे देदीप्यमान यश विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, कोरिओग्राफर यांचे मार्गदर्शन आणि पालकांची मोलाची साथ लाभल्याचे मिळाल्याचे अकॅडमीच्या वतीने सांगण्यात आले.पालक व कला क्षेत्रातील मान्यवरांकडून स्ट्रीट डान्स अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment